"भन्नाट रानवारा, मस्तीत शीळ घाली .... मस्तीत शीळ घाली
रानच्या पाखरांची, रानात भेट झाली
एकाच रानामंदी, वाढलो एका ठाई ....
एकाच रानामंदी, वाढलो एका ठाई ...
पूरान्या वळखीला ज्वानीची नवलाई ...
मनीची खूणगाठ SSSSSS ...
मनीची खूणगाठ, लगीनगाठ झाली ... लगीनगाठ झाली
रानच्या पाखरांची, रानात भेट झाली"
किती सुंदर शब्द आणि तरीही किती साधे. आणि त्यातल्या त्यात ती "पूरान्या वळखीला ज्वानीची नवलाई" ओळ. संदर्भ वयात येण्याशी असला तरीही त्यात कसलीही अश्लीलता नाही, बीभत्सता नाही किंवा भडकपणा नाही. फक्त सहजसुंदर शब्द आणि त्यातून व्यक्त केलेली प्रांजळ भावना.
No comments:
Post a Comment